शेतीचे कंपाउंड साहित्य देतो म्हणून ४ लाख ९० हजार रू. घेऊन फसवणूक करणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

शेतीचे कंपाउंड साहित्य देतो म्हणून ४ लाख ९० हजार रू. घेऊन फसवणूक करणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : शेतीचे कंपाउंडसाठी लोखंडी जाळी, अँगल, तारा, गेट आदी साहित्य देतो म्हणून ४ लाख ९० हजार रू. घेऊन सदरचे साहित्य न देता फसवणूक करणाऱ्या नगर येथील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यात महादेव भगवान पिसाळ (रा. दहिगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की सन २०१६ मध्ये माझ्या शेतीला कंपाउंड करण्यासाठी नगर येथील ओमसाई इंजिनिअरींग कंपनीकडे ऑर्डर नोंदवली होती. त्यासाठी त्यांना स्टेट बँकेचे दोन चेक ४ लाख ९० हजार रूपयाचे दिले. परंतु त्यांनी अद्याप पर्यंत साहित्य दिले नाही व फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!