तब्बल दिडशे किलोचा हार क्रेन द्वारे घालून वामन मेश्राम यांचा करमाळा येथे केला सत्कार

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : काल(दि.३०)
करमाळा येथे बामसेफचे जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या वतीने बामसेफ व भारत मूक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचा भव्य सत्कार करून रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी तब्बल दिडशे किलोचा हार क्रेन द्वारे घालून वामन यांचे स्वागत करण्यात आले.

६ ऑक्टोबर २०२२ रोजी वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बामसेफ व भारत मूक्ती मोर्चा या संघटनेने “आर.एस.एस. या संघटनेची नीती ही संविधान विरोधी असून भारतीय संविधान बदलण्याचा डाव या संघटनेचा आहे” या कारणावरून नागपूर आर.एस.एस मुख्यालयावर आंदोलन केले होते. याबद्दल करमाळा तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) ने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वामन मेश्राम यांचा जंगी सत्कार समारंभ ठेवला होता.

यावेळी वामन यांचा तब्बल दिडशे किलोचा हार क्रेन द्वारे घालून स्वागत करण्यात आले.त्यानंतर भव्य रॅली काढून महापुरुषांच्या पुतळ्यांना पूष्पहार घालण्यात आला. त्यानंतर बामसेफचे जिल्हास्तरीय शिबिर मार्गदर्शन शिबिर करमाळा येथील नालबंद हाॅल येथे पार पडले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेड,राजे ग्रूप ,रंभापूरा,साठे नगर मातंग यूवक संघटना,रिपाई मराठा,मातंग आघाडी,वैदू समाज,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणूमंत मांढरे तसेच सर्व समविचारी संघटनांच्या वतीने देखील मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरपीआय यूवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे,माजी नगराध्यक्ष दिपकराव ओहोळ ज्येष्ठ नेते लक्ष्मण भोसले,सुहास ओहोळ,भिमराव कांबळे,अमोल बनसोडे,मयूर कांबळे,किशोर कांबळे,प्रसेनजीत कांबळे,विजय वाघमारे,इ नी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल दामोदरे यांनी केले.

