घोटी येथे उद्या संत सावतामाळी दूध उत्पादक संस्थेचा वर्धापन दिन समारंभ

घोटी संत सावतामाळी दूध उत्पादक संस्था

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : घोटी ता. करमाळा येथील श्री संत सावतामाळी सहकारी दूध उत्पादक संस्थेचा
उद्या रविवारी (16 ऑक्टोबर) 26 वा वर्धापन दिन समारंभ सकाळी ठीक अकरा वाजता होणार आहे तरी या कार्यक्रमास घोटी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन
मोहन मारुती शेंडे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे (अध्यक्ष- GNC मिल्क कलेक्शन सेंटर, करमाळा) हे राहणार असून मुख्य मार्गदर्शक डॉ.ॲड. बाबूराव हिरडे हे असणार आहेत.

या कार्यक्रमास समीर माने (तहसीलदार, करमाळा), ज्योतिराम गुंजवटे( पोलीस निरीक्षक,करमाळा),मनोज राऊत (गट विकास अधिकारी), संजय वाकडे (तालुका कृषी अधिकारी ) आदी शासकीय अधिकारी
उपस्थित राहणार आहेत.

Anniversary celebration of Saint Savatamali Milk Producers’ Organization tomorrow at Ghoti | Saptahik Sandesh news Karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!