उमरड येथे दारू व झुगार बंदीसाठी सर्व ग्रामस्थ एकवटले... - Saptahik Sandesh

उमरड येथे दारू व झुगार बंदीसाठी सर्व ग्रामस्थ एकवटले…


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथील बाजारपेठेमध्ये दारू तसेच झुगार सारखे अवैद्य धंदे खुलेआम चालू असल्याने या अवैध धंद्यांना ग्रामस्थ त्रासून गेले आहेत दारू तसेच जुगार बंदीसाठी सध्या गावात महिलांचा आक्रोश सुरू आहे, अखेर दारू, मटका, झुगारबंदीसाठी चळवळ उभा राहिली असून, या चळवळीसाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम , ग्रामपंचायत सदस्य समाधान वलटे, भगवान चौधरी, प्रमोद कुलकर्णी, राजू गोडगे यांनी गावकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देत शेकडो ग्रामस्थ बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

या झालेल्या बैठकीमध्ये गावकऱ्यांचा एकच सूर निघाला असून, दारू, जुगार गावातील कायमची बंद झाली पाहिजे, यासाठी उमरड गावचे आजी-माजी सरपंच सदस्य यांनी भागच घेतला पाहिजे असे ग्रामस्थांचे म्हणणे आले, बैठकीला विद्यमान उपसरपंच मुकेश बदे ,माजी सरपंच बापू चोरमले, ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख , ग्रामपंचायत सदस्य चांगदेव चौधारी उपस्थित होते.

या बैठकीत अवैद्य दारू विक्रेते झुगार चालवणारे यांना बोलावून जुगार व दारू बंद करण्याच्या सूचना देण्याचे ठरले, तसेच या संदर्भात पोलिस स्टेशनाला रीतसर निवेदन देणे, दारूची दुकाने व झूगार बंद कारण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकाराने येवून अवैद्य धंद्यांना टाळे ठोकायचे ठरले आहे.

याप्रसंगी नंदकिशोर वलटे, श्रीमान चौधरी,पोलीस पाटील अंकुश कोठावळे,आप्पा कोठावळे,पवन मार्कड,अनिल वलटे,बाळासाहेब घनवट,श्रीकांत मार्कड,भास्कर पडवळे,भीमराव कोडलिंगे,सचिन भीमराव बदे, प्रमोद पडोळे,अंगद पडवळे,बबन बदे,विनायक पडवळे, संदीप चौधरी,अजित चौधरी,श्रीकृष्ण ज्ञानदेव गोडगे,विकास बदे,प्रदीप कोठावळे,रमेश चौधरी,औदुंबर काळोखे,विशाल चौधरी,नवनाथ दिनकर कोठावळे, अंकुश वलटे,गणेश मार्कड,सोमनाथ पठाडे, सत्यवान दत्तात्रेय पाटील,शिवाजी बोराडे,प्रवीण शिंदे ,संतोष पडवळे, विशाल वलटे,दासा लोखंडे,नितीन कदम,भाग्यवंत बंडगर, मारुती कोठावळे,मयूर मोरे,शुभम वलटे,प्रमोद वलटे,ज्ञानेश्वर वलटे,विशाल पठाडे,ओंकार जाधव,रुपेश कदम,ज्ञानेश्वर बदे,माणिक कोठावळे, रामदास हांडे,राजेश कदम,रमेश गोडगे,चंद्रशेखर पाटील,मुकेश बदे, प्रशांत पाखरे,निलेश चौधरी,उत्तम बदे,अशपाक साहेब लाल पठाण,
सारिका शिंदे,कल्पना कदम,साखरबाई इंगळे,राणी कदम,मंगल कदम, शितल शिंदे,सुमन शिंदे,संगीता वाघ,छाया शिंदे,रूपाली साळुंखे, शबाना शेख, प्रियंका चौधरी,रंजना पाखरे,मंगल टोणपे,धनश्री चंद्रशेखर पाटील,नकोशा शिंदे,लता मोरे,वत्सला सुरवसे,बाळू बाई कदम, रंजना पाखरे,विजूबाई कदम,कोमल कदम
आदी शेकडो ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!