भोसे गावच्या सरपंचपदी अमृता सुरवसे यांची निवड - Saptahik Sandesh

भोसे गावच्या सरपंचपदी अमृता सुरवसे यांची निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – भोसे (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अमृता प्रितम सुरवसे यांची काल (दि.२०) रोजी बिनविरोध निवड झाली आहे.

अमृता सुरवसे या यापूर्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच होत्या. मधल्या कालावधीमध्ये त्यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर सौ.वारे उपसरपंचपदी निवडल्या होत्या. तर सद्या सरपंच म्हणून असणारे डॉ. प्रा. दीपक सुरवसे यांनी पार्टी अंतर्गत निर्णयानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी अमृता सुरवसे यांची काल बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अमृता सुरवसे साडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक यांनी एन. डी. सुरवसे यांच्या स्नुषा आहेत. एन. डी. सुरवसे यांनी देखील या आधी भोसे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!