गुळसडी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जि.प .प्राथ शाळा गुळसडी येथे १६ सप्टेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी समाधान यादव यांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून तर धनंजय भंडारे यांची उपाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली.
पुनर्गठन प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी शाळेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिले यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.