शाळा व्यवस्थापन समिती सदस्यपदी अंगद देवकते यांची निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी अंगद देवकते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापनसमितीच्यावतीने अंगद देवकते यांचा श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बप्पा शिंदे, मुख्याध्यापक गजेंद्र गुरव, शिक्षक नाथाजी रंदवे, सौ.मिर्झा, योगेश रंदवे, दिपक बागडे, अशोक शिंदे, योगेश शिंदे, सह महिला पालक उपस्थितीत होते. याप्रसंगी शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास व सेमी इंग्लिश आदेशाच्या विषयीबाबत विचार विनिमय करण्यात आला.