सातोलीत आज कै.सौ.कमल साळुंके यांचे पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीर - Saptahik Sandesh

सातोलीत आज कै.सौ.कमल साळुंके यांचे पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीर

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे…

कंदर : सातोली (ता.करमाळा) येथील कै.सौ.कमल बबनराव साळुंके यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एक दिवसीय मोफत आरोग्य शिबीर आज रविवार 11 सप्टेंबर आयोजित केले असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात कंबरदुखी, मणक्यातील शीर दबणे, मणक्यातील गॅप ,मणक्यातील गादी सरकणे,मणक्यात पाणी होणे,पाठ दुखी,सायटिका,मानेतील मणक्याच्या तक्रारी,फ्रोजन शोल्डर,हात वर न होणे,पेन रिलीफ अशा असाध्य आजारांवर विनाऔषध मोफत उपचार
भारतीय परंपरागत नॅचरोपॅथी,नाभीचिकित्सा,ऍक्युप्रेशर,अक्यू पंक्चर, बोन सेटिंग,कायरोथेरपी अशा विविध पद्धतीने अनुभवी तज्ञांच्या मार्फत विना औषध उपचार केले जाणार आहेत तरी गरजूनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्य हरिश्चंद्र साळुंखे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!