सातत्य असल्यास स्पर्धा परीक्षेत यश निश्चित-गटविकास अधिकारी मनोज राऊत
करमाळा (संदेश प्रतिनिधी)- सातत्य असल्यास स्पर्धा परीक्षेत यश निश्चित मिळते असे प्रतिपादन करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी करमाळा येथे आज (दि.१२) पोलिस भरती मार्गदर्शन शिबिरामध्ये व्यक्त केले. शिवनेरी करिअर अकॅडमी,पुणे यांचे वतीने पोलिस भरती मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले गेले होते.
यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मराठी व्याकरण,अंकगणित,बुदधिमता, सामान्यज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास कसा करावा,कोणती पुस्तके वापरावी,वेळेचे नियोजन कसे करावे, मागील प्रश्नपत्रिका सोडविणे ,याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना शिवनेरी करिअर अकॅडमी पुणे ‘चे संचालक प्रा.संदिपान गुटाळ तर अंकगणिताची माहिती प्रा.सचिन फरतडे यांनी दिली. यावेळी अध्यापक काॅलेजचे प्रा.चौधरी व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.