करमाळा येथील मेकअप आर्टिस्ट निलेश यादव यांना 'महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड' प्रदान - Saptahik Sandesh

करमाळा येथील मेकअप आर्टिस्ट निलेश यादव यांना ‘महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड’ प्रदान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील मेकअप आर्टिस्ट निलेश यादव यांना ७ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील रिसील या कंपनीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड’ या कार्यक्रमात ‘बेस्ट मेकअप आर्टिस्ट’ म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम थे ग्रँड सिटी मॉल, नाशिक येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी मराठी सिनेकलाकार तेजस्विनी पंडित, सोनाली कुलकर्णी व प्रकाश भागवत हे उपस्थित होते. निलेश यादव यांना तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

निलेश यादव यांनी हेअर अँड ब्युटी हा डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला आहे. त्याच बरोबर त्यांनी प्रसिद्ध केश रचनाकार जावेद हबीब यांच्याकडे हेअर अँड केमिकल हा कोर्स पूर्ण केला आहे. त्यांनी मुंबई, चेन्नई आदी ठिकाणी या क्षेत्रातील कामाचा अनुभव घेतला.

त्यानंतर त्यांनी करमाळा येथे कृष्णाजी नगर मध्ये ‘सई हेअर अँड ब्युटी अकॅडमी’ या नावाने व्यवसाय सुरु केला. काम करतानाच त्यांनी याच क्षेत्रातील विविध सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करत स्वतःला अपडेट ठेवले. त्यांच्या कामाचा दर्जा पाहून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानंतर त्यांचे मित्र परिवारातून व करमाळा तालुक्यातुन अभिनंदन केले जात आहे.

आपण कामाचे कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यात स्वतः ला झोकून देऊन काम केले पाहिजे. तसेच नेहमी स्वतः ला अपडेट ठेवत कामाचा चांगला दर्जा दिला तर लोक तुमच्या कामाला पसंती देतात. माझ्या या करिअरला माझी पत्नी आकांक्षा यादव हिने खंबीरपणे साथ दिल्याने मला चांगले काम करता येत आहे. – निलेश यादव

‘Maharashtra Business Award’ presented to Nilesh Yadav, a makeup artist from Karmala | Saptahik Sandesh news

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!