जेऊर येथे 'ग्रामीण शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने व संधी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन - Saptahik Sandesh

जेऊर येथे ‘ग्रामीण शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने व संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील भारत हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. अर्जूनराव सरक यांच्या सेवापुर्ती समारंभा निमित्त 31 मार्च रोजी ‘ग्रामीण शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने व संधी’ या विषयावर लेखक व  व्याख्याते प्राचार्य डॉ महेंद्र कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे प्रमुख प्रा. डाॅ.संजय चौधरी यांनी दिली. 

भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या व माजी आमदार नारायण (आबा) पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना प्रा चौधरी यांनी सांगितले की शुक्रवार दि 31 मार्च रोजी भारत हायस्कूल समोरील कर्मयोगी गोविंदबापू पाटील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी दहा वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत व करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

यावेळी प्रा अर्जून सरक यांची ग्रंथतूला करण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान प्रा डाॅ संजय चौधरी यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!