पोथरे येथील पै.गौतम शिंदे ठरला 80 किलो वजन गटात "महाराष्ट्र कुमार केसरी"चा मानकरी.. - Saptahik Sandesh

पोथरे येथील पै.गौतम शिंदे ठरला 80 किलो वजन गटात “महाराष्ट्र कुमार केसरी”चा मानकरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : 80 किलो वजनी गटामध्ये इचलकरंजी येथे झालेल्या “कुमार महाराष्ट्र केसरी”चे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये करमाळा तालुक्यातील पोथरे गावचे सुपुत्र पै.गौतम सुरेश शिंदे याने 80 किलो वजनी गटात यशस्वी कुस्ती करून “महाराष्ट्र कुमार केसरी”चा मानकरी ठरला आहे.

याप्रसंगी आयोजकांनी पै गौतम शिंदे यांचा गोल्ड मेडल देवून गौरवण्यात आले. या उतुंग यशाबाबत करमाळा तालुक्यातील विशेषतः पोथरे येथील अनेक मान्यवरांनी पै.गौतम शिंदे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!