ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा मध्ये काव्य मैफिल व तिळगूळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.. - Saptahik Sandesh

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा मध्ये काव्य मैफिल व तिळगूळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये महिला पालकांसाठी काव्य मैफिल व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी निमंत्रित कवी म्हणून कवी प्रकाश तात्या लावंड,कवी दादासाहेब पिसे,कवी खलील शेख, कवियत्री डॉ.सौ.चारू देवकर, कवी हरिभाऊ हिरडे यांना खास आमंत्रित केले होते.

यावेळी निमंत्रित कवींना ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा.महेश निकत सर यांच्यातर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सर्वांच्या बहारदार कवितांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तसेच इन्स्टिट्यूट मधील शिक्षिका प्रा.सौ.वाघमारे यांनीही आपल्या बहारदार रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील 100-150 महिलांनी उपस्थीती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी संस्थेच्या संचालिका अश्विनी चव्हाण व इतर सर्व सहकारी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी खलील शेख यांनी केले.आभार प्रा.महेश निकत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!