‘युवा सोशल फाउंडेशन’चे कार्य कौतुकास्पद : प्रताप बरडे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : रावगाव (ता.करमाळा) येथील गेली दहा वर्षे शैक्षणिक क्षेत्रामध्ये व सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सतत कार्य करत गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे युवा सोशल फाउंडेशन चे कार्य हे उल्लेखनीय आहे असे मत मकाई सह साखर कारखान्याचे मा संचालक प्रताप बरडे सर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त केले.
युवा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष अमोल मुळे सचिव संतोष काळे सर डॉ. मनोज कानडे ,अशोक फुंदे सर ,सोमनाथ मटकर, संतोष आवटे सर, गुलाब मटकर सर ,अनिल पवार,महेश मोडके या सर्वांच्या सहकार्यातून दरवर्षी शैक्षणिक कार्यामध्ये इ दहावी मध्ये मिळवलेले यश व इतर स्पर्धा परीक्षेतील मुलांच्या यशाबद्दल बक्षीस वाटप केले जाते.
त्याचबरोबर रावगाव येथील धनगर वस्ती येथील जि. प .प्राथमिक शाळेच्या विज बलभरणा करण्याचे कार्य , त्याचबरोबर राजीव गांधी वाचनालयास वाचनीय पुस्तके भेट ,शिष्यवृत्ती सराव पेपर वाटप अशा अनेक शैक्षणिक कामांमध्ये झोकून देऊन युवा सोशल फाउंडेशन कार्य कौतुकास्पद आहे हे कार्य भावी पिढीतील युवकांना प्रेरणादायी आहे त्यामुळे युवा सोशल फाउंडेशन चे कौतुक मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा संचालक प्रताप बरडे सर यांनी केले.