प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य करमाळा तालुकाध्यक्षपदी शिवाजी मोरे यांची निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : टेंभुर्णी (ता. माढा) गोविंद वृध्द आश्रम येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजी मोरे यांची तर जेऊर येथील माया कदम यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.पी. आंबेगावे यांचे सुचनेनुसार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, उपाध्यक्ष नौशाद मुलाणी व संघाचे महिला जिल्हाध्यक्ष कर्णवर यांचे हस्ते निवडीचे पत्र देवून निवडी करण्यात आल्या आहेत.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. करताना सांगितले की पत्रकरिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याचे योगदान पाहुन सदर नियुक्त्या केल्या आहेत. शिवाजी मोरे (ता.अध्यक्ष) व महिला कर्णवर यांचे हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी ता.अध्यक्ष शिवाजी मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न आपल्या पत्रकारितेच्या माध्यामांतुन तिव्रतेने मांडण्याचा प्रयत्न करेन व संघाच्या ध्येय धोरणानुसार पुढील कार्य केले जाईल. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!