प्रा.राहुल चव्हाण यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.2) : कोर्टी (ता.करमाळा) येथील रहिवासी व पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. राहुल चव्हाण यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरीत करण्यात आले. इतिहास संशोधक व मार्गदर्शक डॉक्टर श्रीमंत कोकाटे, राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ पोकळे तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावानेच शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे,यासाठी सातत्याने गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून प्रबोधन चालू आहे.
त्याचा एक भाग म्हणून आज बालगंधर्व या ठिकाणी महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते मा. खा. राजू शेट्टी व चित्रलेखाचे संपादक अभिनेते दिग्दर्शक ज्ञानेश महाराव सर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व महात्मा फुले गौरव ग्रंथ देऊन प्रा. चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी पी ए इनामदार,दिगंबर दुर्गाडे श्रीकांत शिरोळे,श्रीमंत कोकाटे राहुलभाऊ पोकळे, प्रा.सोमनाथ गोडसे प्रा.औदुंबर लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
माझा हा सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, व सर्व पदाधिकारी तसेच माझे सर्व मार्गदर्शक सहकारी शिक्षक शिक्षकेतर स्टाफ, माझे आई बाबा व कुटुंबीय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे हा प्राप्त झाला ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यामुळे आहे. आणि तो विश्वास सार्थ ठरण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील.
– प्रा.राहुल चव्हाण