गुरुगणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत 90 गाईंची पूजा - 'पोळा' सण उत्साहात साजरा.. - Saptahik Sandesh

गुरुगणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत 90 गाईंची पूजा – ‘पोळा’ सण उत्साहात साजरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील तपश्री प्रतिष्ठान संचलित गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत मान्यवरांच्या उपस्थितीत 90 गाईंची पूजा करून पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी धीरज सोळंकी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते गो – मातेची पूजा करण्यात आली. तसेच सर्व गाईना सर्वांनी पोळ्याचा व गुळाचा नेवेद्य खाऊ घालून पोळा सण उत्साहात साजरा केला. याप्रसंगी बोलताना गोपालन संस्थाचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांनी गोशाळे च्या स्थापनेपासून ते आजपर्यंत च्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी बोलताना ह. प. भ. अमोल महाराज काळदाते यांनी जीवनात गाईंचे महत्व या विषयी माहिती देऊन श्री खाटेर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कार्याबद्दल धन्यवाद देऊन आभार मानले. यावेळेस गाईना सजवण्यासाठी व कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी चंद्रकांत काळदाते, विजय बरीदे, पोपट राव काळदाते, प्रीतम राठोड, शशी अप्पा ननवरे, गिरीश शहा, काळदाते परिवार यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी नगरसेविका संगीता खाटेर, विजया मुनोत, शामला कोठारी, वैशाली गुगळे,मोक्षा खाटेर, विजया कोठारी, सौ काळदाते, यांचे सह गो- सेवा समितीचे प्रकाश मुनोत, जगदीश शिगची, कचरूलाल मंडलेचा, रसिक मुथा, संजय कोठारी, जीवनभाई संचेती, नितीन दोशी, वैभव दोशी, दिनेश मुथा, गणेश बोरा, केतन संचेती आदी सदस्य यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दोशी, अनुप दोशी, पिंटूशेठ गुगळे,प्रीतम लुंकड, धीरज सोळंकी, सुशील कात्रेला, संदीप पवार, बंडू दोशी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संकेत खाटेर यांनी केले. तसेच या कार्यक्रमात वर्धमान खाटेर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!