पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून वांगी नं 1 ते पांगरे रस्त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने “रस्ता संघर्ष समिती “ने केला पेढे भरवून आनंदोत्सव साजरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वांगी नं.1,2,3,4, भिवरवाडी, ढोकरी, नरसोबावाडी, पांगरे (ता.करमाळा) या गावातील नागरिकांच्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या वांगी नं 1 ते पांगरे या रस्त्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रशासकीय व तांत्रिक अशा दोन्हीही मंजुरी मिळाल्याने हा रस्ता मंजुर व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या वांगी परिसरातील लोकांना न्याय मिळवून देणाऱ्या “रस्ता संघर्ष समिती ” ने पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी रस्ता संघर्ष समिती चे सदस्य आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, बाजार समिती चे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर, आदिनाथ चे संचालक पांडुरंग जाधव,आदि नाथचे माजी संचालक भारत साळुंके , महेंद्र पाटील,वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, अर्जुन आबा तकीक, ग्रामपंचायत सदस्य दत्ता बापू देशमुख, तानाजी देशमुख, सचिन पिसाळ, रामेश्वर तळेकर,,धनंजय गायकवाड, सेंद्रिय शेती चे पुरस्कर्ते हनु यादव, ॲड, दिपक देशमुख, ढोकरी चे सरपंच देवा पाटील,माजी सरपंच महादेव वाघमोडे, देवीदास पाटील, पांडुरंग खरात, सुभाष वळसे, बाबासाहेब चौगुले, कुंडला गडदे, सोमा घाडगे,रोहित आहेरकर,गणेश पाटील, देवा तळेकर,वांगी सोसायटी चे संचालक विकास पाटील, वांगी सोसायटीचे संचालक नितीन देशमुख आप्पासाहेब भोसले बापूराव तोबरे ग्रामपंचायत सदस्य अमर आरकीले धनंजय आबा गायकवाड वांगी नं.४ भिवरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉक्टर भाऊसाहेब शेळके आप्पा अरकीले उत्तम धनवे संजय रोकडे कल्याण शिनगारे आदी उपस्थित होते.
यावेळी शहाजीराव देशमुख, प्रा शिवाजीराव बंडगर, महेंद्र पाटील यांनी रस्ता संघर्ष समितीच्या प्रमुखांनी सतत पाठपुरावा व संघर्ष केल्याचा उल्लेख आपल्या भाषणात करीत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार नारायण आबा पाटील, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता भिलारे, व वरिष्ठांनी सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यासाठी 4 कोटी 66 लाख पन्नास हजार इतका निधी वांगी नं 1 ते पांगरे या रस्त्यासाठी मंजूर केल्याबद्दल आनंद व्यक्त करित एकमेकांना पेढे भरवले. वांगी परिसरातील वांगी नंबर 1,2,3,4,ढोकरी बिटरगाव, भिवरवाडी, नरसोबावाडी या गावांनी उजनी धरणासाठी आपले सर्वस्व त्यागले आहे. या विस्थापित गावांचे पुनर्वसन होताना ज्या गंभीर त्रुटी राहिल्या त्याची फळे 45 वर्षा नंतर ही येथील नागरिक भोगत आहेत.
धरणग्रस्तांना अग्रहक्काने देय असलेल्या नागरी सुविधा पैकी पोहोच रस्ते अध्याप ही मिळाले नसल्याने आदिवासी प्रमाणे इथल्या लोकांचे जिणे आहे. ढोकरी ते शेलगाव, पांगरे ते वांगी नंबर 1 हे दोन रस्ते या भागाच्या नसा आहेत.
ढोकरी ते शेलगाव या रस्त्यासाठी ही अतीव संघर्ष उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती ने सलग 25 वर्षे केला.त्याला यश येवून काही वर्षांपूर्वी पूर्ण झाला आहे .
परंतु त्याला ग्रहण लागले अन वांगी नं 3 च्या बाह्यवळण मार्गावर स्थानिक रस्त्याला अडथळा केला. रस्ता संघर्ष समिती ने सलग तीन वर्षे अविरत प्रयत्न करून महसूल खाते, न्यायालय यातून दावे जिंकून रस्ता खुला केला.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मागील काही दिवसात वांगी परिसरातील नागरिकांना भेटण्यासाठी गावभेट दौऱ्यावर आले असता त्याना या बाबत रस्ता संघर्ष समिती ने अवगत केले होते . त्यांनी अधिकारी याना सूचना केल्या. केम ता.करमाळा येथे मागील आठवड्यात रेल्वेच्या कार्यक्रमात येथे ही रस्ता संघर्ष समिती च्या प्रमुखांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
त्यावेळी त्यानी आठवड्यात प्रशासकीय मंजूरी येईल असे सांगितले होते.
त्याप्रमाणे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता भिलारे यानी आज प्रशासकीय व तांत्रिक अशा दोन्ही ही मंजुरी आल्याचे सांगितले. त्यामुळे रस्ता संघर्ष समिती च्या कार्यकर्त्यांनी वांगी नंबर 1 येथील चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढे आनंदोत्सव साजरा केला .
याप्रसंगी आभार रस्ता संघर्ष समिती चे सदस्य अर्जून तकीक यांनी मानले. तर सूत्रसंचालन वांगी चे माजी सरपंच विठ्ठल शेळके यांनी केले, तसेच उपस्थितांचे स्वागत हनु यादव, बाबासाहेब चौगुले, देवा पाटील, यांनी केले.

