निंभोरे येथे रवींद्र वळेकर यांचे सहकार्यातून नवरात्र उत्सवानिमित्त रुक्मिणीताई पठाडे यांचे कीर्तन…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन जय भवानी सार्वजनिक मित्र मंडळा मार्फत केले जाते.

निंभोरे येथे देखील नवरात्र उत्सवानिमित्त गावातील एकच मंडळ गावातील तरुण वर्ग एकत्र येऊन स्थापन केले आहे. ‘एक गाव एकच देवी मातेची स्थापना’ केली जाते. निंभोरे गावात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे.

कोरोना महामारीनंतर यावर्षी मोठ्या उत्साहाने मंडळाने देवीची प्रतिष्ठापना केली आहे. तेव्हा गावातील लोकं मोठ्या उत्साहाने सकाळी व संध्याकाळी आरतीच्या वेळी देवीसमोर दर्शनासाठी एकत्र येतात. यावेळी भक्त जणांना महा प्रसादाचे वाटप गावचे उपसरपंच जोतीराम वळेकर व रविदादा वळेकर यांचे कडून करण्यात आले.

नवरात्र उत्सव साजरा करत असताना काही तरी इतर कार्यक्रम घेण्यापेक्षा लोकांना मार्गदर्शन पर कीर्तन सोहळा आयोजित करायचा असे निंभोरे गावचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळेकर व मंडळाचे पदाधिकारी यांनी ठरविले.

याप्रसंगी ह.भ.प. रुक्मिणी महाराज पठाडे (कर्जत) यांचा भक्ती पर कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी त्यांचे समवेत दीपाली ताई खिळे,दत्ता महाराज खामकर, रामचंद्र मामा खिळे,रणजित देवकर उपस्थित होते.तसेच गावातील भजनी मंडळी यांचे सहकार्य लाभले. यावेळी रुक्मिणीताई महाराज पठाडे यांचा सन्मान महानंदा अंकुश वळेकर यांचे कडून हार,श्रीफळ,शाल देऊन करण्यात आला व त्यांच्या सहकाऱ्यांचाही सन्मान हार, श्रीफळ,शाल देऊन मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व रवींद्र वळेकर आणि आर.व्हि.ग्रुप चे पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र वळेकर यांनी केले होते. यावेळी जयभवानी सार्वजनिक मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर.व्हि. ग्रुप चे पदाधिकारी तसेच जय भवानी सार्वजनिक मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!