श्रीकमलादेवी मंदिर संवर्धन कार्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-बोबे परीवाराकडून पंचावन्न हजार रूपये जमा -

श्रीकमलादेवी मंदिर संवर्धन कार्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-बोबे परीवाराकडून पंचावन्न हजार रूपये जमा

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी

करमाळा,ता.२३: श्रद्धा, परंपरा आणि जतनाचा सुंदर संगम असलेल्या श्रीकमलादेवी मंदिर संवर्धन कार्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या पुण्यकार्यात बोबे परिवाराने पुन्हा एकदा मोठा हातभार लावला आहे.

अक्षय्य तृतीया च्या पवित्र मुहूर्तावर, १९ एप्रिल ला श्री. नारायण गणपत बोबे (सर) यांनी मंदिर जतन व संवर्धन कार्यासाठी रोख रु. १२,०००/- ची देणगी देऊन आपली धार्मिक बांधिलकी अधोरेखित केली. या उदात्त योगदानाबद्दल त्यांचा सत्कार दिपक थोरबोले, अशोक गाठे, संजय (बापू) घोलप व श्री. वाळके यांच्या हस्ते करण्यात आला.
विशेष म्हणजे, बोबे परिवाराचा हा सहभाग केवळ आजपुरता मर्यादित नसून त्यांनी यापूर्वीही सातत्याने देणगी दिली आहे.

६ नोव्हेंबर २०२४ – रु. २१,०००/-
१२ एप्रिल २०२५ – रु. ११,०००/-
२३ डिसेंबर २०२५ – रु. ११,०००/-
१९ एप्रिल २०२६ – रु. १२,०००/-
अशा प्रकारे बोबे परिवाराकडून आजपर्यंत एकूण रु. ५५,०००/- (पंचावन्न हजार) इतकी उल्लेखनीय देणगी प्राप्त झाली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानामुळे मंदिर जतन संवर्धन कार्याला मोठा बळ मिळत आहे.
दरम्यान, श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट च्या पुढाकाराने सुरू असलेले हे पुरातन दगडी मंदिर जतन व संवर्धन काम सध्या प्रगतीपथावर असून, लवकरच भाविकांना मंदिराचे मूळ स्वरूपात दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या पवित्र कार्यात सर्व भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी केले  आहे. ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
अशोक गाठे (व्यवस्थापक)
मो. ९४०४७०८९२४ यांच्याकडे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!