करमाळा-केम या रस्त्यावरच्या पुलांची अवस्था अत्यंत दयनीय…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यात काल (ता.११) झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा-केम या रस्त्यावरच्या पुलांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून, करमाळा-केम हा रस्ता तालुक्याचा प्रमुख मार्ग आहे जो हाच मार्ग पुढे माढा तालुक्यातील काही गावांना जोडला गेला आहे. त्यामुळे या तसेच गुळसडी सर्व पुल दुरुस्ती करण्यात यावे

अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. वरकट्णे, साडे, सरपडोह, निंभोरे, मलवडी, घोटी, भोगेवाडी, पाथर्डी अशा अनेक गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे, पण यांच रस्त्याच्या पुलाची काम करण्याची मागणी व पुलांची उंची वाढवण्यासाठी मागणी या गावांमधुन होत आहे, तसेच अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा हवालदिल, निराश झालेला आहे, कारण केळी, उस, मका, झेंडु, उडिद इत्यादी पिंके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे प्रशासनाने लवकरात पंचनामे करुन त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गाकडून होत आहे

वरकटणे, कुंभेज रोडवरील भोसले वस्ती नजीकचा फुल पूर्णपणे वाहून गेला आहे, तसेच शेतीचे दळणवळण बंद झाले आहे, या मार्गावरील वरकटणे केम रस्त्यावरील वर्कटने गावाजवळील पूल धोकेदायी अवस्थेत आहे. याबाबत संबंधीत विभागाने तातडीने लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत – (बापुसाहेब तनपुरे सरपंच प्रतिनिधी, वरकटणे)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!