तलावासाठी संपादित केलेली जमीन परत न दिल्यास आत्मदहन करणार - शेतकऱ्याने निवेदनाद्वारे दिला इशारा - Saptahik Sandesh

तलावासाठी संपादित केलेली जमीन परत न दिल्यास आत्मदहन करणार – शेतकऱ्याने निवेदनाद्वारे दिला इशारा

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : पाटबंधारे विभागाने विना मोबदला संपादित केलेली व तलावाच्या पाण्यात न गेलेली जमीन कसण्यास कायमस्वरूपी मिळावी अशी मागणी केम तालुका करमाळा येथील अपंग शेतकरी ज्ञानदेव रामचंद्र देवकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्ह्याधिकारी यांच्या कडे केली आहे. हि जमीन कसण्यास न दिल्यास ५ डिसेंबर लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

त्या निवेदनात म्हटले आहे की मौजे केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून माझ्या नावावर केम येथे गट नंबर 558 /१,५५८/२,५५९व५६० या जमिनी होत्या सदरच्या जमिनी तील पाझर तलावात म्हणजे (पळसाचे शेत) या जमिनी विनामोबदला संपादित झालेली आहे सदर जमिनीशिवाय मला दुसरी कोणतीही जमीन नाही त्यामुळे मी भूमिहीन झालेलो आहे तसेच मी स्वतः अपंग असून मला वाॅकरच्या सहाय्याशिवाय चालता येत नाही. शिवाय सोबत एक माणूस असल्याशिवाय प्रवास करता येत नाही. माझी संपादित जमीन हि पाटबंधारे विभागाने कोणताही मोबदला न देता संपादित केलेली आहे.सदर जमिनीच्या आजच्या भावाप्रमाणे संपादन करून मला मोबदला देण्यात यावा. ही पहिली माझी मागणी आहे.

या तलावात माझे क्षेत्र संपादित झाले असले तरी पाण्यात गेलेले नाही, त्यामुळे सदरचे क्षेत्र कायमस्वरूपी वहिवाट करणे कामी मला देण्यात यावी सदर मिळकत हि पाटबंधारे विभागाने गट नं ५५८/१मधील१हे,६८आर व गट नंबर ५५८/२मधील१हे,२०आर हे संपादित झालेले क्षेत्र गाळपेरीसाठी देण्यात येत असल्याचे १९९५ ला एका आदेशानुसार कळविले आहे परंतू सदरची मिळकत वाहि वाटण्यासाठी लगतचे शेतकरी मी अपंग असल्याने मला त्रास देत आहेत व हरकत करत आहेत त्यामुळे सदरची जमीन संपादित झाली असली तरी प्रत्यक्षात या तलावात पाण्याखाली जात नाही त्यामुळे सदरची जमीन वर्षानुवर्षी पडिक आहे ती जमीन माझ्या नावावर करण्यात यावी ही माझी दुसरी मागणी आहे.

यासाठी ज्या जमिनी म्हणजे केम येथील गट नंबर ५५८/१,५५८/२,५५९,व५६० या मिळकतीवर शासनाचे लागलेले नाव कमी करण्यात यावे यासाठी मी वारंवार प्रयत्न करत असूनही याची कोणतीही कार्यवाही केली जात नाही वरील संदर्भानुसार आपण उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी याना दि २/६/२०२२ रोजी पत्र पाठवून हि या बाबत उपविभागीय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही व मला न्याय दिलेला नाहि मला दि ५/१२पर्यत म्हणजे आगामी लोकशाही दिनार्यंत न्याय मिळावा जर मला न्याय मिळाला नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११वा, कोणत्याही क्षणी मी आत्मदहन करणार आहे याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहिल कारण आता माझे जगणे अशक्य झाले आहे मला आता कोणी नाही माझी पत्नी मरण पावली आहे सध्या मी भिक मागून जगावे लागत आहे माझी मिळकत मला मिळणार नसेल तर मेलेला बरे असे ठरवून मी आत्मदहन करणार आहे असे त्यांनी म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति मा महसूल मंत्री विखे पाटील, पोलीस अधिक्षक ग्रामीण सोलापूर मा तहसील कार्यालय करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!