ब्राह्मण महिला संघाचा 'हळदी कुंकु समारंभ' उत्साहात संपन्न.. - Saptahik Sandesh

ब्राह्मण महिला संघाचा ‘हळदी कुंकु समारंभ’ उत्साहात संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : श्री दत्त मंदिर दत्त पेठ येथे ब्राह्मण महिला संघ करमाळा यांच्या वतीने हळदी कुंकु व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ब्राह्मण महिला संघाची नवीन कार्यकारिणी संगठीत केली असून नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष – सौ निलिमा अनिल पुंडे
उपाध्यक्ष – सौ स्वाती मसलेकर
कोषाध्यक्ष – सौ आरती सूर्यपुजारी
सचिव – सौ ज्योती कुलकर्णी
सह सचिव – सौ शुभांगी खळदकर
संपर्क प्रमुख – सौ सारीका पुराणिक
प्रसिद्धी प्रमुख – सौ मयुरी गंधे
वरील प्रमाणे बिनविरोध निवडून दिलेल्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे उपस्थित ब्राह्मण महिला भगिनींनी अभिनंदन केले .

या कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन सौ कुरुलकर यांचे हस्ते झाले, स्वागत व प्रास्ताविक निलिमा पुंडे यांनी केले. यावेळी पल्लवी तरकसे, वंदना पाटील, सौ कुरुलकर, ज्योती मांगीकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली, कार्यक्रमाचे आभार सारीका पुराणिक यांनी मानले, कार्यक्रम हसतखेळत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी पुजा मसलेकर, ज्योती कुलकर्णी, शैलजा भणगे, ज्योती मांगीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ब्राह्मण महिला संघाचे बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!