संस्कृती प्रतिष्ठानाची दहीहंडी फोडण्यास हजारो तरुणांचा सहभाग - Saptahik Sandesh

संस्कृती प्रतिष्ठानाची दहीहंडी फोडण्यास हजारो तरुणांचा सहभाग

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : संस्कृती प्रतिष्ठानाची मानाची दहीहंडी फोडण्यास हजारो तरुणांनी सहभाग नोंदवला ,संस्कृती प्रतिष्ठानची मानाची प्रतिष्ठित दहीहंडी महोत्सव वर्ष आठ वे या दहीहंडीचे आयोजन करमाळा शहरातील सुभाष चौक येथे १९ ऑगस्टला सायंकाळी पाच ते दहा या वेळेत करण्यात आला.

यावेळी हजारो तरुणांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला ,दहीहंडी महोत्सवचे प्रमुख आकर्षण त्रिशूल व डमरू ची सजावट व साऊंड सिस्टिम & लाईट डेकोरेशन लावून करण्यात आली होती. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रशांत ढाळे, अतिश दोषी ,लक्ष्मीकांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी पथकाचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवर म्हणून भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव , जयराज चिवटे, तालुका सरचिटणीस रामभाऊ ढाणे शहराध्यक्ष जगदीश भैय्या अग्रवाल व्यापारी सेल अध्यक्ष जितेश कटारिया नगरसेवक अतुल फंड बोरगावचे सरपंच विनय ननवरे ,श्रीकांत ढवळे ,अशपाक जमादार, महेश श्रीवास्तव आधी जण उपस्थित होते या दहीहंडी भव्य महोत्सवास करमाळा शहरातील राजेराव रंभा मित्र मंडळ देवीचा माळ, सावंत गल्ली ,मंगळवार पेठ, नागराज गल्ली ,राशिन पेठ ,फंड गल्ली, सिद्धार्थ नगर, युवा संघर्ष प्रतिष्ठान, स्वराज्य ग्रुप, रॉयल ग्रुप, धर्मवीर प्रतिष्ठान .इत्यादी गोविंद पथकांनी हजेरी लावली. यावेळी करमाळा पोलीस व वीजवितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, या दहीहंडी महोत्सवाचे आयोजक संपूर्ण संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक रोहित चिवटे अध्यक्ष अनिकेत इंदुरे उपाध्यक्ष निरंजन कांबळे,कृष्णा येलवणे सचिव प्रज्वल पोळके कार्याध्यक्ष अमित कांबळे, व सर्व सदस्य झटून सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!