कामोणे येथील शेतकरी बाळासाहेब काळे यांना 'उद्यान पंडित पुरस्कार' जाहीर - Saptahik Sandesh

कामोणे येथील शेतकरी बाळासाहेब काळे यांना ‘उद्यान पंडित पुरस्कार’ जाहीर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कामोणे येथील प्रगतशील आवळा उत्पादक शेतकरी बाळासाहेब काळे यांना राज्य शासनाने उद्यान पंडित पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार नुकताच राज्याचे राज्यपाल रमेश भैस यांचे हस्ते देण्यात येणार आहे. दोन लाख रूपयाचा चेक, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

बाळासाहेब काळे यांनी आठ एकर आवळा पिकातून ४३ लाख रूपयाचे उत्पन्न मिळवले आहे. जिरायत पट्ट्यात ठिबक सिंचनचा वापर करून त्यांनी उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचा पुरेपूर विनीयोग करून त्यांनी पीक घेतल्याने हा पुरस्कार देण्यात आला. राज्याच्या कृषी संचालकाची कमिटी कामोणे येथे येऊन त्यांनी भेट देवून गेले आहे.

ग्रामीण भागात विशेष काम करायचे ठरवले होते. माझी आवळा या फळावर श्रध्दा असल्याने त्यावरच काम करण्याचे ठरवून मी आठ एकरात आवळा पीक घेतले. तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांना लागवडीसाठी मी प्रवृत्त केले आहे. भविष्यात जास्तीत जास्त आवळा उत्पादक शेतकरी निर्माण करून आवळ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार आहे. – बाळासाहेब काळे (कामोणे)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!