विविध आखाडयातील साधूंच्या उपस्थितीत उत्तरेश्वर मंदिरात विद्यागिरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

0

केम (संजय जाधव) – केम येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात ब्रम्हाचैत्यन्य विद्यागिरी महाराज यांची १८ वी पुण्यतिथी मोठया भक्तीभावात साजरी करण्यात आली.

या निमित्ताने सकाळी ८ ते १० या वेळेत मंदिरातील सर्व देवस्थान व समाधीस अभिषेक करण्यात आले. या अभिषेकासाठी ह.भ.प. मारूती पळसकर, मच्छिंद्र गुरूजी,रमेश दिक्षीत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हनुमंत गिरी महाराज यांनी होमहवन व ९ ग्रहांची पुजा केली. १० ते १२ या वेळेत ह.भ.प.ज्ञानेश्वर पाटिल दहिवली यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यानंतर बरोबर १२.०५ मी, विद्यागिरी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी संत म्हणून निराळे बाबा यांची उपस्थिती होती

या वेळी महाराष्ट्र व इतर राज्यातील विविध आखाडातील साधुनी उपस्थिती लावली होती. या मध्ये नामदेव गौरी, सागर भारती रेखागिरी, नागा बाबा, कुमार गिरीजी, योगी प्रतिकुनाथ, आजीनाथ गिरीजी शिवनाथ बाबा मरामनाथ कल्याण गिरी, युवराज नंदिजी, शिवशंकर भारती, नागेश गिरीजी, ह.भ.प. स्वप्नील शिंदे, सरस्वती, प्रविण भारती, सत्यनारायण गिरीजी, गंगानाथ गिरी, सुरज भारती,जी, दसरागिरीजी, सुरेश गिरी, नागनाथ रोकडे, राजाराम कदम आदि साधु उपस्थित होते या कार्यक्रमासाठी हाजारो भाविकांची उपस्थिती होती आलेल्या सर्व भाविकांना व साधुना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी जयंतगिरी महाराज यांचे भक्तगण यांनी रात्रदिवस परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!