ऑल इंडिया शूटिंग स्पर्धेमध्ये यशवंत शिंदे यांनी पटकावले सुवर्णपदक.. - Saptahik Sandesh

ऑल इंडिया शूटिंग स्पर्धेमध्ये यशवंत शिंदे यांनी पटकावले सुवर्णपदक..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
राजस्थान येथील जयपूर येथे सुरू असलेल्या 31 व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावलकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र राज्याकडून प्रतिनिधित्व करणारे निमगाव टे ता. माढा चे सरपंच, विठ्ठल कार्पोरेशन लि. म्हैसगावचे कार्यकारी संचालक व करमाळा आमदार संजयमामा शिंदे यांचे सुपुत्र यशवंत शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.

यशवंत शिंदे यांनी सिंगल ट्रॅप इव्हेंट मध्ये 50 पैकी 44 गुण मिळवून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. जयपूर येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा या प्रमुख राज्यांसह देशातील विविध राज्यातील 300 स्पर्धक सहभागी झाले आहेत.

यशवंत शिंदे यांना सिद्धार्थ पवार यांचे मार्गदर्शन लाभले, यशवंत शिंदे यांना सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन माढा मतदारसंघाचे आ. बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजिततसिंह शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, धनराज दादा शिंदे यांसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!