केम येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

केम(संजय जाधव): शिवसेना महिला आघाडीच्या वतीने २३ जानेवारीला केम येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वर्षा चव्हाण म्हणाल्या की, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली बाळासाहेब ठाकरे च्या मते समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे पण मराठी माणूस मागेच राहिला आहे महाराष्ट्रात सुविधा उद्योग आहेत मराठीत तरुण बेरोजगार आहेत यासाठी त्यांनी मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कामगार सेनेची स्थापना केली यामधून तरूणाना रोजगार दिला शिवसेना ही संघटना ८० टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे करीत आली. शिवसेनेमुळे महाराष्ट्रात मराठी माणूस ताट मानेने उभा राहिला ते हिंदुत्ववादी होते गर्वसे कहो हम हिंदू है असा त्यांचा नारा होता त्याची कीर्ती संपूर्ण हिंदूस्तान मध्ये होती.
यावेळी महिला आघाडीच्या केम शाखाअध्यक्षा आशा मोरे, बीता शिंदे, रेश्मा देवकर, सुरेखा दुरगुळे, ज्ञानेश्वरी केंगार मनिषाताई माने मनिषा दौड, रोहिणी नागणे,राणी तळेकर आदि उपस्थित होत्या.






