करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाध्यक्षपदी दिपक पाटणे - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार - Saptahik Sandesh

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाध्यक्षपदी दिपक पाटणे – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडून तालुक्यातील प्रत्येक गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी कटबद्ध राहील अशी प्रतिपादन नवनियुक्त अध्यक्ष दिपक पाटणे यांनी केले, या निवडीनंतर सह्याद्री अतिथी गृहावर दिपक पाटणे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

दिपक पाटणे हे करमाळा तालुका मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष असून, राशीन पेठ तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्यात उल्लेखनीय असे काम आहे,
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने विविध आरोग्य शिबिरे घेणे गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार करून देणे, शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे, या त्यांच्या कामाची दखल घेऊन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.
या निवडीनंतर बोलताना दिपक पाटणे म्हणाले की, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून इथून पुढे काम करणार असून, करमाळा तालुक्यातील गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देणे, डायलिसिसची गरज असणाऱ्या लोकांना डायलिसिसची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करमाळा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

या निवडीत बद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे शहर प्रमुख संजय आप्पा शीलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे नागेश गुरव राशीन पेठ तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष पिंटू शेठ गुगळे नीरज गुगळे जे जे युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे यांनी अभिनंदन केले आहे.

Dipak Patane | Karmala Shivsena Vaidyakiy Madat kaksha

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!