निवडणूक प्रक्रियेत दिसून आले महिलाराज – बूथ क्रमांक २३१ चे कामकाज महिला अधिकाऱ्यांनीच पाहिले
केम (संजय जाधव) – करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महिलांनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंजली मरोड यांनी काम पाहिले, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी काम पाहिले. याचबरोबर विशेष म्हणजे केम येथील मतदान केंद्र क्रमांक २३१ चे संपूर्ण कामकाज देखील महिलांनीच पाहिले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत मध्ये महिलाराज असल्याचे दिसून आले.
करमाळा तालुक्यातील केम येथे शांततेने मतदान पार पडले. केम येथे एकूण ७७५९ मतदार आहेत त्यापैकी ५१५६ मतदारांनी मतदान केले. एकूण ६६.४५ टक्के मतदान झाले. या मध्ये एकूण आठ बुथ होते त्यापैकी श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये केंद्र क्रंमाक २३१ मध्ये आदर्श मतदान केंद्र पिक बुथ महिलांचे केंद्र होते. या केंद्राचे काम सर्व महिलांनी पाहिले.
या केंद्राचे केंद्राध्यक्ष म्हणून सौ सुरेखा चौरे गावडे, मतदान अधिकारी क्र.१ सुनिता रंदवे,मतदान अधिकारी क्र.२ वैशाली नरखेडकर, मतदान अधिकारी क्र.३ पल्लवी गाडे तर त्यांना सहाय्यक म्हणून उर्मिला खुळे, कांचन हिवरे व सेवक शाम तळेकर यांनी काम पाहिले. या मतदान केंदावर एकूण ८५५ मतदारानी हक्क बजावला या मध्ये ४७१ पुरूष व ३८४ स्त्रिया असे मतदान झाले या केंद्राचे मतदारांनी कौतूक केले. या केंद्रासमोर सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. रंगी बेंरगी फुग्याची कमान केली होती. हे मतदान केंद्र मतदाराचे लक्ष वेधून घेत होते. या महिला मतदान केंद्रातील सर्व महिला अधिकाऱ्यांचे तहसिलदार शिल्पा ठोकडे, करमाळा निवडणूक मतदान अधिकारी अंजली मुरूडकर यानी कौतूक केले.