केम येथील शंभुराजे तळेकर याची राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड - Saptahik Sandesh

केम येथील शंभुराजे तळेकर याची राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम गावचा सुपुत्र शंभुराजे सचिन तळेकर याने तालुकास्तरीय व जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये १७ वर्ष वयोगट ६५ कि वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर यश संपादन करून त्याची राज्यस्तरीय निवड झाली आहे.

तो सध्या वेंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा घाटगी तालुका जिल्हा धाराशिव या विद्यालयात शिकत आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल केम येथील गोसेवक परमेश्वर तळेकर व अतुल तळेकर यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व पुढील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!