जि.प. कुंभेज शाळेतील विद्यार्थ्यांची खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – माॅडर्न खो-खो असोसिएशन सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून अहमदनगर जिल्हाचे प्रतिनिधीत्व करत जिल्हा परिषद कुंभेज शाळेने सुयश मिळविलेले आहे.
या स्पर्धेतून महाराष्ट्र व नाॅर्थ महाराष्ट्र या दोन संघाची निवड करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र संघातून जिल्हा परिषद कुंभेज शाळेतील कु. सायली दादासो भोसले, कु स्नेहल ईश्वर भोसले या दोन विद्यार्थांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे तसेच नाॅर्थ महाराष्ट्र संघातून कु. श्रावणी भाऊसाहेब कन्यहेरे व कु. अनुष्का उमेश थोरे स्नेहल शिंदे, सिद्धी काळे यांची निवड झाली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक शहाबुद्दीन मुलाणी मुख्याध्यापिका अंजली निमगिरे, व सर्व शिक्षक, शिक्षीका यांचे मार्गदर्शन लाभले या बद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कादगे, तसेच श्री आण्णासाहेब साळुंखे विकास कन्हेरे गुरूजी रणजित काळे, सरपंच व उपसरपंच ग्रामस्थ पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. या शाळेचे करमाळा तालुक्यांतून कौतुक केले जात आहे.