जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर दोशी परिवाराची प्रगती

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३:जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या बळावर दोशी परिवाराने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या प्रगतीमागे धार्मिक संस्कार आणि विचारांची परंपरा असून, त्यामुळेच त्यांना उत्तुंग यश प्राप्त झाले असून पुढील काळातही मोठे यश मिळेल, असा विश्वास बारामती येथील चंदुकाका ज्वेलर्सचे संचालक अतुल शहा यांनी व्यक्त केला.

करमाळा शहरातील जैन मंदिर परिसराशेजारी ‘मेनरोवर आनंदी ज्वेल्स’ या नवीन सोने-चांदी विक्रीच्या दुकानाचे उद् घाटन अतुल शहा यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक अॅड. डॉ. बाबुराव हिरडे तसेच साडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एन. डी. सुरवसे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना अतुल शहा म्हणाले, दोशी परिवाराने धर्मसंस्कार जपत, प्रामाणिकपणे व्यवसाय करत संस्कृतीचे जतन केले आहे. त्यातूनच त्यांनी यशाची उंची गाठली आहे. अशोककुमार दोशी, राजकुमार दोशी, सौ. अर्चना दोशी तसेच युवा पिढीतील अमोल दोशी, अभिजित दोशी, यशराज दोशी, प्रतीक दोशी यांनी व्यवसाय वृद्धीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळेच जोरदार प्रगती झाली आहे.
या कार्यक्रमात एन. डी. सुरवसे व अॅड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थितांचे स्वागत अमोल दोशी व अभिजित दोशी यांनी केले.


यावेळी सुनंदा गांधी, मृदुला गांधी, सुषमा चंकेश्वरा, विदुलता चंकेश्वरा, प्रवीण गांधी, बबनभाऊ सुरवसे, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी तसेच नवभारत इंग्लिश स्कूलच्या सुनिता देवी आदी मान्यवर व ग्राहक उपस्थित होते.
