दहावीच्या निकालात सर्व विषयात ‘३५’ गुण- अक्षय भालेरावचे सर्वत्र कौतुक -

दहावीच्या निकालात सर्व विषयात ‘३५’ गुण- अक्षय भालेरावचे सर्वत्र कौतुक

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.८ : कामोने (ता.करमाळा) येथील व करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी अक्षय बाळासाहेब भालेराव याने दहावीच्या परीक्षेत एक अनोखा विक्रम घडवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दहावीच्या परीक्षेत अक्षयला प्रत्येक विषयात नेमके ३५ गुण मिळाल्याने सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
अक्षयला मराठी – ३५, हिंदी – ३५, इंग्रजी – ३५, गणित – ३५, विज्ञान – ३५ आणि सामाजिक शास्त्र – ३५ असे सर्व सहा विषयांत समान गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्याचे एकूण ५०० पैकी १७५ गुण झाले असून तो उत्तीर्ण झाला आहे.
दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थी उच्च गुण मिळवून चर्चेत येतात; मात्र अक्षयने सर्वच विषयात समान ३५ गुण मिळवून वेगळीच ओळख निर्माण केली आहे. “प्रत्येक विषयात एकसारखे गुण मिळणे ही बाब विशेष मानली जाते ”
अक्षयच्या या अनोख्या निकालाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली असून मित्रपरिवार, शिक्षक व ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. “पास होण्यासाठी लागणारे गुण प्रत्येक विषयात अचूक मिळवणे हा नशिबाचा भाग नसून ते बुध्दी कौशल्य मानले जाते.” असे म्हणत अनेकांनी अक्षयचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!