भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन पुण्यामध्ये आजपासून सुरू

पुणे : पुण्यातील मोशी (भोसरी) येथे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आज (दि.१४ ) पासून भरले असून 18 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे.आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा या किसान प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.
हे प्रदर्शन मोशी मधील 15 एकर परिसरात असून यात 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनं सादर करणार आहेत.
या किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका आणि शेती लघु उद्योग अशी विभागवार स्टॉल्स उभी करण्यात आलेली आहेत. शेतीसाठी लागणारी यंत्रे आणि उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत असणार आहे.