सवाई गंधर्व महोत्सवाला पुण्यामध्ये आजपासून सुरुवात
पुणे : संगीतप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाला पुण्यामध्ये आजपासून (१४ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो.पुण्यातील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात हा महोत्सव आयोजित केला आहे.
दिनांक 14 ते 18 डिसेंबर 2022 हे पाच दिवस हा कार्यक्रम दुपारी चार ते दहा या वेळेत होणार आहे . या कार्यक्रमाला १०० रु तिकीट असून ५ दिवसाचे वेगळे तिकीट देखील उपलब्ध आहे. कार्यक्रम स्थळी सुमारे 7 ते 8 हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य दिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त संगीतप्रेमींसाठी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केले.या कार्यक्रमाचे वेळापत्रक खालील फोटोमध्ये दिले आहे.