तुळजाभवानीचे प्रतिरूप करमाळ्याची कमलाभवानी
🖋️संजय जाधव,केम
करमाळ्याच्या पूर्वेला दोन किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवरील मंदिरातील करमाळ्याची आराध्य देवता श्री कमलाभवानी माता ही महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते.
१७ व्या शतकामध्ये मराठा सरदार व तुळजाभवानीचे उपासक राजेरावरंभा निंबाळकर यांच्या काळात करमाळ्यामध्ये कमलाभवानी मातेचे वैशिष्ट्यपुर्ण मंदिर बांधकाम व देवीची प्रतीष्टापना करण्यात आली आहे…कमलाभवानीचा इतिहास पाहिला तर मराठा सरदार राजेरावरंभा निंबाळकर यांच्या उपासने मुळेच तुळजापूरची तुळजाभवानी माताच करमाळ्यात दाखल झाल्याचे सांगण्यात येते.
तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या करमाळ्याच्या कमलाभवानी मातेला मोठा इतिहास लाभला आहे करमाळ्याच्या पूर्वेकडील उंच माळावर वैशिष्ट्यपुर्ण स्थापत्यकलेचा नमुना असणारे कमला भवानीचे मंदीर आहे
१७ व्या शतकात बांधण्य़ात आलेले आहे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसत आहे उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायऱ्यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची ४.३ फुटाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे.
मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे गाभाऱ्यात श्री विष्णु-लक्ष्मिची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सुर्यानारायनाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणात आहे सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे.
मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे गाभाऱ्यात श्री विष्णु-लक्ष्मिची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सुर्यानारायनाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे…एकाच मंदिरात पाच देवतांचे शक्तीपंचायतन असलेले करमाळ्यातील कमलाभवानी मातेचे मंदिर दुर्मीळ आहे तसेच कार्तिक स्वामीची मूर्ती देखील या मंदिरामध्ये पहावयास मिळेल. या शिवाय मुख्य मंदिराच्या समोर तीन गगनचुंबी गोपुरे आहेत.
शहरामध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश करताना दुरवरूनच देवी मंदिराचे स्थान दर्शविणारी ही गोपुरे उत्कृष्ट बांधणीची साक्ष देत उभी आहेत मंदिर बांधणीचा विचार केला तर या मंदिर बांधकामात ९६ या आकडयाला फारच महत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे कारण ७५ फुट लांबी व ६५ फुट रुंदीच्या या मंदिराची उभारणीच ९६ खांबावर झाल्याचे दिसत आहे.