करमाळ्यातील वाढते अतिक्रमण व अस्वछता यावर लवकरात लवकर उपाय केला पाहिजे - Saptahik Sandesh

करमाळ्यातील वाढते अतिक्रमण व अस्वछता यावर लवकरात लवकर उपाय केला पाहिजे

समस्या – करमाळा शहरातील अनेक समस्यांपैकी काही

वाढते अतिक्रमण: शहरात सर्वच बाजुंनी अतिक्रमण वाढत आहे यात एस टी स्टँड, देवीचामाळ रास्ता, पोथरे नाका ई. अशी भरपुर ठिकाणे आहेत जिथे लोकांनी सुरवातीला छोट्या प्रमाणात टपरी, गाडा लावणे चालु केले व नंतर पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण भक्कम केले. आता तर नवीन अतिक्रमण होत आहेत उपजिल्हा रुग्णालया समोरील दत्त मंदिर परिसरात ठिक ठिकाणी बांबू रोवून काही शेड उभा झाले आहेत तर काही बांबू रोवून पत्रे लावण्याच्या तयारीत आहेत.याकडे नगरपालिकेने लक्ष देऊन अतिक्रमण रोखुन शहराचे विद्रुपीकरण रोखावे ही अपेक्षा!

दत्त मंदिर ते सारंगकर हॉस्पिटल रोडवरील अतिक्रमणे
आगार व्यवस्थापक बंगला, बारा बंगले रोड शेजारी
दत्त मंदिर रोड

करमाळा बसस्थानक परिसर अस्वछता – करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात बघावे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.परिसराच्या स्वच्छतेकडे करमाळा बसस्थानक प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. याचबरोबर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने व वैयक्तिक वाहने यांचे चालक वाहने बस स्थानक परिसरात पार्क करून निवांत निघून जातात. अशा पार्किंगचे प्रमाण तर भरपूर वाढते जेंव्हा बस स्थानक समोरील मंगल कार्यालयात काही कार्यक्रम असतात.

समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून – करमाळा नगर परिषद, करमाळा बसस्थानक प्रशासन

समस्या मांडणारे – नाव गोपनीय

The increasing encroachment and filth in Karmala should be resolved at the earliest | saptahik sandesh citizen Reporter news karmala Solapur

इथे रिपोर्ट करा : संदेश सिटीझन रिपोर्टर फॉर्म

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!