कंदर येथील 3 महिलांना दारू विक्री करताना पकडले – तिघीवर गुन्हे दाखल..

करमाळा संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कंदर (ता.करमाळा) येथे दारू विक्री करणाऱ्या तीन महिलांना महिलांना जागीच पकडले असून त्यांच्याकडून 2120/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ महादेव जगताप तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल बापूराव जगताप यांनी फिर्याद दिली असून त्या त्यांनी म्हटले की, मी पोलीस कॉन्स्टेबल श्री उबाळे, पोलीस नाईक, श्री ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल श्री जगताप, पोलीस कॉन्स्टेबल पारधी असे आम्ही कंदर भागात पेट्रोलिंग करत होतो.
कंदर येथील पाण्याचे बोगद्याजवळ पत्र्याचे आडोशाला एक महिला दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच आम्ही तेथे जाऊन त्या महिलेला नाव विचारले असता तिने पिंकी अशोक काळे (वय 30) रा. कंदर असे सांगितले तिच्याकडून 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच पुढे कंदर येथीलच आणखी एका महिलेला दारू विक्री करताना पकडले असून तिला तिचे नाव विचारले असता माधुरी अक्षय काळे (वय 30) रा. कंदर असे सांगितले तिच्याकडून 540 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे, तसेच तसेच कंदर येथील रोहिणी महेश पवार वय 25 ही महिला दारू विक्री करत असताना आढळून आली तिच्याकडील 980 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, याप्रकरणी या तीनही महिलेंवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे गुन्हा दाखल केला आहे.
