किरकोळ कारणावरून कुंभेज फाट्यावरील हॉटेलमध्ये ९ जणांकडून ६ जणांना बेदम मारहाण.. - Saptahik Sandesh

किरकोळ कारणावरून कुंभेज फाट्यावरील हॉटेलमध्ये ९ जणांकडून ६ जणांना बेदम मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा (ता.२०) : हॉटेलमध्ये जेवण करत असताना पाठीमागून डोक्यात लागलेली बाटली का फेकून मारली असे विचारले असता नऊ जणांकडून सहा जणांना बेदम मारहाण करण्यात आले आहे, याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे 

याप्रकरणी शुभम शिवाजी कोंडलकर, (वय- 24)वर्षे, रा-शेलगाव (वां), ता.करमाळा याने करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्याने म्हटले कि, गावातील माझे मित्र 1) गणेश कुंडलिक बेरे 2) संतोष कुंडलिक मारकड, 3) अमोल भटाजी केकाण 4) विश्वनाथ मोहन कुंभार 5) राहुल 6) सुजित काटे असे आम्ही सर्वजण मिळून कुंभेज येथील हॉटेल निसर्ग येथे 17 डिसेंबरला दुपारी 1 वाजता जेवण करणेकरिता गेलो होतो. आमचे टेबलचे शेजारी माझे परिचयाचे 1) तुषार आवटे 2) गणेश रायकर 3) दादा सुरवसे 4) विशाल आवटे 5) विजय भोसले 6) संदिप गायकवाड 7) दादा सुर्वे 8 ) तुषार तुषार झाकणे 9) सागर वायकर तेथे जेवण करत होते. 

त्यावेळी तेथील एकाकडून फेकून मारत असलेली एक बाटली ही सुजित काटे यास पाठीमागुन डोक्यावर लागली. तेव्हा मी तुषार आवटे यास विचारले की, तुम्ही बाटली फेकुन का मारली असे विचारताच इतर दारू पिण्याकरिता बसलेल्या लोकांनी शिवीगाळ करत तेथील खुर्च्या व बाटली फेकुन मारण्यास सुरूवात केली. तेव्हा तेथील हॉटेल कामगार व हॉटेलचे मालक हे तेथे साडवासोडव करण्यास आले. त्यांनी आमचे भांडण सोडवत असताना तुषार आवटे याने मला त्याचे हातातील दारूच्या बाटलीने माझ्या डोक्यात मारले व इतर लोकांनी खुर्च्या व हाताने लाथाबुक्याने मला व माझे  

मित्रांना मारहाण केली. तेव्हा माझ्या डोक्यातुन रक्त येवु लागल्याने मला माझे मित्रांनी उपचारकामी उपजिल्हा रूग्णालय करमाळा येथे दाखल केले. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!