माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मागणीची दखल - शेतकर्‍यांना डीसीसी बॅंक देणार तिसऱ्या दिवशी कर्ज.. - Saptahik Sandesh

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मागणीची दखल – शेतकर्‍यांना डीसीसी बॅंक देणार तिसऱ्या दिवशी कर्ज..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : ओटीएसच्या नियमांतर्गत ज्यादिवशी शंभर टक्के रक्कम बँकेकडे जमा केली जाईल, त्यादिवशी शेतकर्‍याचे क्षेत्र, पिक, पिककर्जाच्या दुप्पट रकमेचा इ करार बोजा नोंदीचा सातबारा आदी बाबींची पूर्तता होताच तिसऱ्या दिवशी शेतकर्‍याचा कर्जरोखा करण्याचा स्तुत्य निर्णय सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष कुंदन भोळे यांनी घेतला आहे, याबाबत बँकेचे माजी व्हा.चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी श्री भोळे यांनी पदभार घेताच लेखी निवेदनाव्दारे व दुरध्वनीवरून संपर्क साधत मागणी केली होती.

माजी आमदार श्री.जगताप यांनी दिलेल्या लेखी निवेदनात ओटीएस (एकरकमी परतफेड योजना) मध्ये सहभागी थकबाकीदार शेतकर्‍यांना पुन्हा नव्याने कर्जवाटप होत नसल्याने याचा बँकेची थकबाकी वसुलीवर होत असलेला परिणाम व पर्यायाने सदरचे शेतकरी हे राष्ट्रीयीकृत बँकेकडे तसेच खाजगी सावकारीकडे वळत असलेबाबत लक्ष वेधले होते, त्यामुळे ओटीएस ची प्रभावी अंमलबजावणी व सहभागी शेतकर्‍यांना सोसायटी मार्फत कर्जवाटप करणेची मागणी केली होती . जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार घेताच माजी आमदार जगताप यांनी केलेली मागणी व शेतकरी तसेच बँकेच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णया बाबत जिल्हाभरातून सर्वत्र स्वागत केले जात आहे.

याबरोबरच माजी आमदार जगताप यांनी जिल्हा बँक व सोसायटी यांच्यामधील कर्जवाटप तसेच वसुलीसाठी महत्वाचा दुवा म्हणून काम करीत असलेल्या गटसचिवांच्या थकीत व नियमीत पगारी बाबत निर्णय घेणेविषयी मागणी केली असून याबाबत देखील सकारात्मक असल्याचे श्री.भोळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!