कंदर येथून १६ वर्षाची युवती बेपत्ता.. - Saptahik Sandesh

कंदर येथून १६ वर्षाची युवती बेपत्ता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कंदर (ता. करमाळा) येथे ऊसतोड मजूराची १६ वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी व माझे पती, मुलगी असे तिघेजण ऊसतोडीच्या सध्या कंदर येथे आलो होतो.

२६ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे मी व माझे पती ऊस तोड करण्यासाठी आमच्या कोपीतून सकाळी साडेसात वाजता निघून गेलो. त्यावेळी माझी मुलगी कोपीतच घरी होती. सायंकाळी साडेपाच वाजता ऊसतोड करून आम्ही पुन्हा कोपीकडे आलो असता, आमची मुलगी तेथे दिसून आली नाही. त्यावेळी आम्ही सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली. सर्व ठिकाणी पाहिले परंतू ती आढळून आली नाही. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे आम्हाला संशय आहे. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!