रात्री दीड वाजता घरात घुसून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

रात्री दीड वाजता घरात घुसून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल..

करमाळा संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : खडकी (ता.करमाळा) येथील एकाने रात्री 1:30 वाजता शेजारील घरात घुसून दोघांना मारहाण करून, घरातील सामान  फेकून देवून सात हजार रुपयांचे नुकसान केले आहे, याप्रकरणी त्या व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला झाला आहे. 

याप्रकरणी दत्तात्रय विष्णू मिरगे रा.खडकी यांनी करमाळा पोलिसात फिर्यादी दिली असून, त्यात त्यांनी म्हटले की, माझ्या घराच्या समोरच काही अंतरावर बालाजी भास्कर मिरगे हा राहत असून त्याला दारूचे व्यसन आहे तो दारू पिऊन आल्यानंतर आम्हास विनाकारण शिवीगाळ करतो. हा प्रकार त्याचा बराच वेळा घडलेला आहे, परंतु आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.  24 नोव्हेंबर रोजी आम्ही सर्व झोपलेलो असताना रात्री 1:30 वा. सुमारास बालाजी भास्कर गिरमे हा दारू पिऊन आला व त्याने घराबाहेर येऊन शिवीगाळ सुरू केली.

त्यानंतर मी घराबाहेर येऊन त्याला समजावून सांगत असताना त्यांनी माझे वडील विष्णू मिरगे यांना लाथाबुक्काने मारहाण केली, त्यांना सोडावा सोडाव करण्यासाठी गेलो असता, त्याने माझ्या मोटारसायकलवर दगड मारला तसेच माझ्या घरात घुसून घरातील एलसीडी टीव्हीवर दगड मारून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले, यामध्ये माझ्या घरातील सात हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी भास्कर मिरगे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!