घरासमोर लावलेली 30 हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्याने पळविली.. - Saptahik Sandesh

घरासमोर लावलेली 30 हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्याने पळविली..


करमाळा संदेश प्रतिनिधी :  

करमाळा : घरासमोर लावलेल्या 30 हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने पळवुन नेली आहे,  ही घटना 23 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी रवी मधुकर काळे रा.अर्जुननगर ता.करमाळा यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले की, मी माझी मोटरसायकल क्रमांक एम एच 45 ए एम 0056 ही मोटरसायकल घेऊन मी माझ्या गावातून दहीटना ता. परंडा जि. उस्मानाबाद या शाळेवर ये जा करण्यासाठी वापरत होतो.

नेहमीप्रमाणे 22 नोव्हेंबर रोजी मी माझ्या राहत्या घरासमोर रात्री नऊ वाजता माझी काळा रंगाची होंडा शाईन गाडी लावली होती, सकाळी उठून पाहिले असता, माझी गाडी घरासमोर दिसून आली नाही, त्यानंतर आमचे गावातील नातेवाईक सुनील नारायण घाडगे, सौदागर कृष्णाजी घाडगे यांच्याकडे चौकशी केली, परंतु गाडी मिळाली नाही, त्यानंतर लक्षात आले की अज्ञात चोरट्याने गाडी पळवुन नेली आहे, याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!