केम येथे पोलिसभरती पुर्व प्रशिक्षण व दोन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – राज्य शासनाकडून येणाऱ्या काळात पोलिस महा भरती (१८००० + जागा) प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या केम व तालुक्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केम येथे मोफत भरती पुर्व प्रशिक्षण व दोन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा येत्या २८ व २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत शिवशंभू वाचनालय हॉल, केम येथे होणार आहे.
यावेळी स्पर्धामित्र अकॅडमी बार्शी चे संचालक आणि केम गावचे सुपुत्र प्रा. ए. एम. शेख, कमांडो करियर अकॅडमी चे प्रा. भूषण मोरे,महावीर तनपुरे (NSG black cat commando ) हे मान्यवर स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.
तरी केम व तालुक्यातील पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन फायदा घ्यावा असे आवाहन केम येथील आयोजक वसंत तळेकर, सागरराजे तळेकर यांनी केले आहे.