उमरड येथे २० हजारांची मोटारसायकल चोरट्याने पळविली - Saptahik Sandesh

उमरड येथे २० हजारांची मोटारसायकल चोरट्याने पळविली

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथे घरासमोर लावलेली २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाड़ीने चोरून नेली आहे. हा प्रकार २३ सप्टेंबरच्या रात्री घडला आहे.

याप्रकरणी अमोल महादेव लोकरे ( रा.शिराळा ता. माढा जि. सोलापूर, हल्ली रा.उमरड ता.करमाळा) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि, उमरड (ता.करमाळा) येथे २३ सप्टेंबरच्या रात्री आमच्या घरासमोर लावलेली २० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्र. MH.45.AK.5345 ही लावली होती.

त्यानंतर मी जेवन करून झोपी गेलो होतो. त्यानंतर रात्री 12/00 वा. चे सुमारास आमचे कंपनीत काम करणारे इंजीनिअर प्रितम घुमटे हे जागे असताना त्यांनी मी लावलेल्या ठिकाणी माझी मोटारसायकल पाहीली होती. मी सकाळी 08/00 वा.चे सुमारास झोपेतून उठून घरासमोर आलो असता मला माझी मोटार सायकल घरासमोर दिसली नाही. त्यावेळी मी माझे सोबत असलेल्या लोकांना मोटारसायकल कोणी घेऊन गेले आहे ? काय याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी मोटारसायकल नेली नसल्याबाबत सांगितले.

त्यानंतर आम्ही माझे मोटारसायकलचा घराचे आजूबाजूला उमरड गावामध्ये तसेच इतरत्र ठिकाणी शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे सदर मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाड़ीने चोरून नेली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

2

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!