आमदार रोहितदादा पवार यांचा करमाळ्यात सत्कार - Saptahik Sandesh

आमदार रोहितदादा पवार यांचा करमाळ्यात सत्कार

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी किसान सेलचे तालुका अध्यक्ष सचिनभाऊ नलवडे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजन सूर्यवंशी, शिवसेनेचे नगरसेवक ननवरे जामखेडचे संतोष गव्हाळे, देवीचामाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनिल पवार, सचिन गायकवाड, अमोल यादव, लाला शिंगटे, लाला काळे, अतुल होगले, निहाल तांबोळी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऋषीकेश शिगची, शाखा अध्यक्ष अनिकेत ढावरे, उपाध्यक्ष शुभम वारे, सालीम सय्यद, रामेश्वर भरते, महेश वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!