राजुरीत लम्पीमुळे एका गाईचा मृत्यू – लम्पीग्रस्त आणखी जनावरांवर उपचार सुरु

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राजुरी (ता.करमाळा) येथील एका शेतकऱ्याची दुधाळ गाई लम्पी आजारामुळे मृत्यू पावली, याप्रकरणी डॉक्टरांनी 8 दिवस शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा गाय वाचविण्यात यश मिळाले नाही, आज सर्व शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तलाठी,पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृत जनावराची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

लंम्पीने ग्रास्त असलेल्या जनावरांसाठी विलगीकरण सेंटरची परवानगी द्यावी अशी मागणी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष सरपंच डॉ.अमोल दुरंदे यांनी केली आहे. याबाबत पुढे त्यांनी म्हटले कि, लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, राजुरी गावामध्ये लंम्पीची लागण असलेले अनेक जनावरं आहेत, लंम्पी हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तो जलदगतीने पसरत आहे.तरी लवकरचं लम्पि ने ग्रास्त असलेल्या जनावरांसाठी विलगीकरण सेंटरची परवानगी ग्रामपंचायतीला मिळावी.
अशी मागणी राजुरी चे लोकनियुक्त सरपंच व सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!