भाळवणी येथे चोरी - ६५ हजार रूपयाचा ऐवज लंपास.. - Saptahik Sandesh

भाळवणी येथे चोरी – ६५ हजार रूपयाचा ऐवज लंपास..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : घराच्या दरवाजाची कडी उचकटून चोरट्याने घरात प्रवेश करून ६५ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार १४ जानेवारीच्या मध्यरात्री भाळवणी येथे घडला आहे.

या प्रकरणी नितीन येताळ बनसोडे (रा. भाळवणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १४ जानेवारीला आम्ही सर्व जेवून झोपलो होतो. शेजारच्या खोलीचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून झोपलो होतो. त्या मध्यरात्री दाराची कडी उचकटून चोरट्याने घरातील लोखंडी पेटी उचकटून त्यातून २५ हजार रूपये रोख, १५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याची ठुसी व १५ हजार रूपयाचा सोन्याच्या गंठनचा पट्टा चोरट्याने चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!