अंजनडोह येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी - Saptahik Sandesh

अंजनडोह येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी

चोरी chori

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : अंजनडोह (ता. करमाळा) येथे बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करून कपाट उघडून ८ हजार रूपयाची सोन्याची नथ चोरून नेली आहे. हा प्रकार १५ सप्टेंबर पूर्वी घडला आहे. या प्रकरणी बाळासाहेब दशरथ खंकाळ (रा. अंजनडोड, ह. रा. शास्त्रीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझे वडील गावी असतात, ते कुलूप लावून माझ्याकडे आले होते. त्यावेळी चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील ८ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ चोरून नेली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!